मनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’ - Marathi News 24taas.com

मनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’

www.24taas.com, मुंबई
अमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला आणि या पहिल्याच शोने ट्विटरसह लोकांच्या मनाला साद घातली आहे. शो संपण्यापूर्वीच या शो संदर्भात ट्विटरवर जबरदस्त ट्विटिवाट ऐकायला मिळाला. शो अप्रतिम असल्याचे सुमारे २२५४ ट्विट करण्यात आले. याचे पुर्नःप्रसारण स्टार प्लस आणि दूरदर्शनवरही करण्यात आले.
 
किरण बेदी – अमिर खानच्या या कार्यक्रमाला पैकीच्या पैकी मार्क....हा रचनात्मक आणि तथ्यांवर आधारित कार्यक्रम आहे. भावनिकदृष्ट्या हा लोकांना जोडणारा कार्यक्रम आहे. धन्यवाद
 
प्रिती झिंटा – अमिर खानला सत्यमेव जयते या कार्यक्रमात स्त्री भ्रुण हत्या या विषयावर चर्चा करताना पाहिले. त्यांच्या या प्रयत्नांना सलाम .... एक महिला म्हणून मी त्यांना धन्यवाद देते.
 
दिया मिर्झा – मला टीव्हीवर असे काही पाहण्याची इच्छा होती. लोकांना जागे केल्याबद्दल धन्यवाद आमिर....
 
फरहान अख्तर – मनाच्या गोष्टींशी निगडीत शो आहे.
 
बमन इरानी – खूप चांगला शो आमिर....
 
शबाना आजमी – आमिरचा शो क्रांती आणू शकतो. हा संपूर्ण संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे. या सर्व बाबींवर लक्ष्य देण्यात आले आहे.
 
कबीर बेदी -  आमिरचा शो सत्यमेव जयते ने मुलींच्या हत्येचा मुद्दा उठवला आहे, जो देशासाठी कलंक आहे. पण आमिर खूप छान...
 

First Published: Monday, May 7, 2012, 17:31


comments powered by Disqus