आमिर खान गहलोत यांच्या भेटीला - Marathi News 24taas.com

आमिर खान गहलोत यांच्या भेटीला

www.24taas.com, जयपूर
 
टी व्ही शो 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून कन्या भ्रूण हत्येवर लगाम घालण्याचा उपक्रम सुरू करणारा फिल्म स्टार आमिर खान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे.
 
गहलोत यांच्या निवासस्थानीच आमिर त्यांची भेट घेणार आहे. आपल्या टीव्ही शो दरम्यान आमिरच्या लक्षात आलं की राजस्थानमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी आहे. तेव्हा आपल्या शो मध्ये आमिर म्हणाला होता, की ही स्थिती सुधारावी यासाठी तो राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांना पत्र लिहून या प्रकरणातील डॉक्टरांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटले दाखल करणार आहे.
 
याच संदर्भात आमिर खान आज गहलोत यांची भेट घेत आहे. सत्यमेव जयतो या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये राजस्थानातील कन्या भ्रूण हत्येसंबंधित बरीच माहिती मिळाली होती. तसंच दोन माध्यमकर्मींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाचीही माहिती त्याला मिळाली होती.

First Published: Wednesday, May 9, 2012, 18:21


comments powered by Disqus