गुत्थी- कपिल- कपिल-बेबनाव- बेबनाव- गु्त्थी- गुत्थी- बाहेर! Why Gutthi is quitting show?

गुत्थी- कपिल- कपिल-बेबनाव- बेबनाव- गु्त्थी- गुत्थी- बाहेर!

गुत्थी- कपिल- कपिल-बेबनाव- बेबनाव- गु्त्थी- गुत्थी- बाहेर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रसिद्ध कॉमेडी शो `कॉमेडी नाईट्स विथ कपिल`मध्ये गुत्थीचं पात्र साकारणाऱ्या सुनील ग्रोवरने कार्यक्रमाला अलविदा केलं आहे. सुनीलच्या अचानक शो सोडून जाण्यामागे नेमकं काय कारण याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.

गुत्थीला दुसऱ्या चॅनलकडून स्वतंत्र द गुत्थी शो करण्याची ऑफर आल्याची माहिती देण्यात येत आहे. हा शो कपिलच्याच शोशी स्पर्धा करणारा असेल. गुत्थीचं पात्र खूपच प्रसिद्ध झाल्यामुळे अभिनेता सुनील ग्रोवरने सध्याच्या मानधनापेक्षा तिप्पट पैसे वाढवून मागितल्याचंही कारण देण्यात येत आहे. तसंच काहीजणांच्या मते गुत्थीचं पात्र कपिलपेक्षाही जास्त गाजायला लागल्यामुळे कपिल नाराज झाला आहे. त्यामुळे गुत्थीचं पात्र कमीत कमी दाखवण्यास त्याने सुरूवात केली. या गोष्टीने नाराज होऊन गुत्थीने बाहेरचा रस्ता धरल्याची वदंता आहे.

काही सूत्रांच्या मते गुत्थीला विदेशात कार्यक्रम मिळाल्यामुळे सुनील ग्रोवर कपिलच्या शोकडे दुर्लक्ष करत असल्याचीही टीका काही जणांनी केली आहे. यामुळेच कपिल आणि गुत्थीमध्ये बेबनाव होऊन गुत्थी आता शोमधून बाहेर पडत आहे. एक मात्र खरं, की गुत्थीशिवाय कपिलच्या शोमधील गंमत कमी होणार.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 15:30


comments powered by Disqus