Last Updated: Saturday, July 28, 2012, 23:09
www.24taas.com, कोलंबो गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली आणि आज टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गंभीरने कारकीर्दीतील 11वे शतक त्याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.
गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेला रोहित शर्मा आजही भोपळा फोडू शकला नाही. आल्यापावली मलिंगाने त्याला तंबूत पाठवले. तत्पूर्वी, श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करणा-या टीम इंडियाला सलग दोन धक्के बसले. संयमी फलंदाजी करणा-या कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा यॉर्कर किंग मलिंगाने त्रिफळा उडवला. धोनीने 31 धावा केल्या. गौतम गंभीर आणि सुरेश रैना फलंदाजी पिचवर आहेत.
अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज आणि जीवन मेंडीस यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रीलंकेने अखेरच्या षटकांमध्ये खो-याने धावा काढल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने भारताला धावांचे 287 आव्हान दिले. मॅथ्यूजने तडाखेबाज अर्धशतक ठोकले. त्याला मेंडीसने अप्रतिम साथ दिली. मॅथ्यूजने 57 चेंडुंमध्ये नाबाद 71 तर मेंडीसने 40 चेंडुंमध्ये नाबाद 45 धावा काढल्या. अखेरच्या षटकांमध्ये दोघांनी तुफान फटकेबाजी करुन टीम इंडियाच्या गोलंदाजांना जेरीस आणले.
भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.
लाईव्ह स्कोर जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा टीममधले बदल :भारतभारतीय टीममध्ये लेग स्पिनर राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांचा आजच्या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. तर प्रज्ञान ओझा आणि उमेश यादव आज मैदानाच्या बाहेर असतील.
श्रीलंकाश्रीलंकन टीममध्ये जीवन मॅन्डीज याला आजच्या मॅचसाठी संधी मिळालीय. तर लाहिरी थिरमाने आजच्या टीममधून बाहेर आहे.
First Published: Saturday, July 28, 2012, 23:09