टीम इंडियातून हरभजन आऊट, झहीर इन - Marathi News 24taas.com

टीम इंडियातून हरभजन आऊट, झहीर इन

झी 24 तास वेब टीम, मुंबई



ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. हरभजन सिंगला खराब कामगिरीमुळे पुन्हा एकदा टीममधून डच्चू देण्यात आलाय. तर झहीर खान फिटनेस असल्यास त्याचा टीममध्ये समावेश करण्यात येईल.



झहीरसहित 17 जणांच्या टीमची घोषणा करण्यात आलीय. मुंबईच्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माचाही टीममध्ये समावेश करण्यात आलाय. तर वृध्दीमान साहा याचा दुसरा विकेटकिपर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आलाय.



युवराजला आजारामुळे विश्रांती देण्यात आलीय. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार टेस्टची सीरिज खेळली जाणार आहे. पहिली टेस्ट मेलबर्न इथं खेळली जाईल.

First Published: Sunday, November 27, 2011, 07:13


comments powered by Disqus