Vijay, Yogeshwar to get Khel Ratna; Arjuna award for 25 -24taas.com

खेलरत्न, अर्जुन पुरस्कार जाहीर

खेलरत्न, अर्जुन  पुरस्कार जाहीर
www.24taas.com,नवी दिल्ली

भारताचा शुटर विजय कुमारला आणि योगेश्वर दत्तला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर युवीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

विजयनं लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल शूटिंगमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर योगेश्वर दत्तने ६० किलो फ्रिस्टाईल वजनी गट कुस्तीमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली होती. ऑलिम्पिकमधील चमकदार कामगिरीमुळेच विजय आणि योगेश्वरला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तर नुकत्याच कॅन्सरवर मात करून टी-२० वर्ल्ड कपकरता भारतीय टीममध्ये जागा पटकावणारा ऑलराऊंडर युवराज सिंगची अर्जुन अवॉर्डकरता निवड करण्यात आली आहे.

२९ ऑगस्टला राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कांस्य पदक विजेता राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या अध्य़क्षतेखाली १५ जणांच्या टीमने ही नावे निवडली आहेत. खेलरत्न पुरस्कारासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. याआधी सायना नेहवाल आणि मेरी कोमला खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.

२५ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात हॉकीचा खेळाडू सरदार सिंह, पेहलवान गीता फोगाट, नरसिंह यादव, नेमबाज अनु राज सिंह, ओंकार सिंह, बॅडमिंटन खेळाडू पी कश्यप, अश्विनी पोनप्पा, तिरंदाज दीपिका कुमारी, बोम्बायला देवी अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये समाविष्ट असल्याची माहिती आहे.

First Published: Saturday, August 18, 2012, 22:19


comments powered by Disqus