ऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले, Australia defeat West Indies by 17 runs via D/L method

ऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले

ऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले
www.24taas.com, कोलंबो
वेस्ट इंडिजच्या १९१ धावांचा पाठलाग करताना ९ षटक आणि १ चेंडूत १०० धावा झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस मेथर्ड नुसार विजयी घोषीत करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना १७ धावांनी खिशात घातला. त्यामुळे ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ अंकासह प्रथम स्थान पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून सुरूवातीला डेव्हीड वॉर्नर १४ चेंडूत २८ धावा आणि नंतर शेन वॉटसनने २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत तडकाफडकी ४१ धावा काढल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने केवळ दहाव्या षटकात स्कोअरबोर्ड १०० वर नेऊ ठेवला. त्यानंतर पावसाने आपला डाव दाखवला आणि सामना पावसात वाहून गेला.

चांगल्या धावगतीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला हा सामना बहाल करण्यात आला.


सुरूवातीला प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून क्रिस गेल याने ३३ चेंडून ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. तर त्याला चांगली साथ देत सॅम्युल्सने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार ठोकत चांगली साथ दिली. आज पोलार्डची जादू चालली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, शेन वॉटसनने २, कमिन्स, क्रिश्चन आणि हॉग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

First Published: Sunday, September 23, 2012, 00:00


comments powered by Disqus