Last Updated: Friday, September 21, 2012, 19:38
www.24taas.com, पल्लेकेलेकिवी ओपनिंग बॅट्समन ब्रॅन्डन मॅक्युलमने बांग्लादेशविरूद्ध धडाकेबाज बॅटिंग करताना टी-20 करिअरमधील दुसरी सेंच्युरी ठोकली... अशी कामगिरी करणारा टी-20 करिअरमधील मॅककुलम पहिलाच बॅट्समन ठरलाय आहे.
मॅककुलमच्या धडाक्यापुढे बांग्लादेशी बॉलर्सचं काहीएक चाललं नाही... मॅककुलमने केवळ 51 बॉल्समध्ये सेंच्युरी पुर्ण केली... 58 बॉल्समध्ये 123 रन्सची खेळी करणाऱ्या मॅककुलमने खणखणीत 11 फोर आणि 7 सिक्सर्स ठोकले... याआधी बॅन्डनने 28 फेब्रुवारी 2010 रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध ख्राईस्टचर्चला नॉट आऊट 116 रन्सची खेळी केली होती...
First Published: Friday, September 21, 2012, 19:33