रैनाने घातला ट्विटर घोळ, पाकवर केली टीका, Suresh Raina’s twitter gaffe

रैनाने घातला ट्विटर घोळ, पाकवर केली टीका

रैनाने घातला ट्विटर घोळ, पाकवर केली टीका
www.24taas.com, नवी दिल्ली
टी-२० विश्व चषकातील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघावर हल्लाबोल करून क्रिकेटर सुरेश रैनाने एक नवा वाद ओढवून घेतला आहे.

एक दोन दिवस उशीरा घरी गेलात आणि ते पण बेशर्म होऊन गेलात.... बाय बाय पाकिस्तान!!! अशी बोचरी कमेंट सुरेश रैनाने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहे
.
सुरेश रैनाच्या अशा कमेंटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्याने अशा प्रकारे कमेंट देऊन अखेलाडीवृत्तीचे प्रदर्शन केले असल्याचीही टीका होत आहे.

रैनाने हा ट्विट डिलिट केला असून माझ्या पुतण्याने ही कमेंट टाकली असल्याचे स्पष्टीकरण सुरेश रैनाने दिले आहे.
स्मार्ट फोन खूप घातक आहेत. हे मला काल रात्री कळाले, माझ्या पुतण्याने सहज ट्विट केले होते. मी एक खेळाडू आहे आणि कोणाचाही मी अनादर करत नाही, असे ट्विट रैनाने स्पष्टकरणासाठी केले आहे. आता मी ही कमेंट डिलीट केली आहे. यामुळे कोणी अपसेट झाले असले तर मला माफ करा, मला कोणाचाही अनादर करायचा नव्हता.

First Published: Friday, October 5, 2012, 17:25


comments powered by Disqus