Last Updated: Wednesday, April 10, 2013, 15:48
www.24taas.com, एडिनबराएडिनबरामधील संशोधकांनी सुमारे किलोमीटर अंतरावरील वस्तूंचे ३डी फोटो काढणारा कॅमेरा तयार केला आहे. हॅरिएट वॉट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी भौतिक शास्त्रातील तंत्र वापरून हा कॅमेरा बनवला आहे. लेजरचा वापर करत हा कॅमेरा सर्व वस्तूंना स्कॅन करू शकतो.
संशोधकांचा दावा आहे की, हे तंत्र अजून विकसित करून १० किमी अंतरावरील वस्तूंचेही फोटो काढता येऊ शकतात. त्यादृष्टीने सध्या प्रयत्न चालू आहेत. या कॅमेराचा वापर मुख्यत्वे वाहनांचे फोटो काढण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र या कॅमेराने माणसाचे फोटो काढता येत नाहीत.
या कॅमेरामधील लेजर मानवी त्वचेतून आरपार जात असल्यामुळे माणसाचे फोटो या कॅमेराने काढता येत नाही. त्यामुळे पूर्ण नग्न होऊन एखादा माणूस समोर आला, तर तो माणूस फोटोत दिसत नाही. मात्र कपडे घातले असल्यास ते कपडे फोटोत दिसू शकतात. लष्करासाठी तसंच रस्त्यांवरील अपघातांसदर्भातील माहितीसाठी या कॅमेरांचा उपयोग होऊ शकतो.
First Published: Wednesday, April 10, 2013, 15:48