Last Updated: Monday, February 10, 2014, 20:11
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, जगातल्या सर्वांत जुन्या ताऱ्याचा शोध लागलाय. `एएनयू` म्हणजेच `ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी`नं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सोमवारी सर्वांत जुना तारा शोधण्यात आल्याचा दावा केलाय.
खगोलशास्त्राचे संशोधक स्टेफन केलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वांत प्राचीन ताऱ्याची रासायनिक छायाचित्रे मिळवण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश मिळालंय. त्यामुळे पहिल्या आणि सर्वांत प्राचीन ताऱ्याला जाणून घेता येणं शक्य झालंय.
जवळपास १३.७ अब्ज वर्षांपूर्वी या ताऱ्याची निर्मिती झालीय. हा तारा `बिग बँग`मुळे निर्माण झालाय. ऑस्ट्रेलियाच्या स्कायमॅपर दुर्बीणीमधून या ताऱ्याचं निरीक्षण केलं गेलं. प्रथम पाच वर्षे अवकाशातील ताऱ्यांचा नकाशा तयार करण्यात आला.
पृथ्वीचं वय ४.५४ अब्ज वर्ष आहे तर सूर्य हा ४.५७ अब्ज वर्षांचा आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की `एएनयू`च्या संशोधनात शोधण्यात आलेला हा तारा किती जुना असू शकतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 10, 2014, 19:34