Last Updated: Thursday, March 27, 2014, 12:52
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई अँड्रॉइड फोनधारकांनो जरा जपून राहा. कारण तुमच्या फोनवरही व्हायरसची नजर असू शकते. `डेंड्रॉयड` नावाचा हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनवर ताबा घेऊन डेटा खराब करु शकतो असे, सायबर सिक्युरिटी विभागाने सांगितलंय.
`डेंड्रॉयड`ने अॅटॅक केल्यावर फोनचं व्यवस्थापन त्यांच्याकडे जाते. त्यामुळे फोनमधील कंमाड आणि कंट्रोल सर्व्हर बदलला जातो. इनकमिंग आणि आऊटगोईंग एसएमएस बंद करणे, कॉल रेकॉर्ड करणे, वेब पेज चालू करणे, कोणाही नंबर लावणे, अशी अनेक अॅप्लिकेशन हा व्हायरस चालू करतो.
`डेंड्रॉयड` हा ट्रोजन घराण्यातील एक आहे. या व्हायरसने अँड्रॉइड स्मार्टफोन हॅक होतो. एकदा का हा तुमच्या फोनमध्ये आला, तर त्याचा परिणाम थेट तुमच्या खासगी डेटावर होऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगा आणि धोका टाळा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 27, 2014, 12:52