सावधान... फेसबुक बघताय, याची नक्की काळजी घ्या!Beware ... take care while use Facebook

सावधान... फेसबुक बघताय, याची नक्की काळजी घ्या!

सावधान... फेसबुक बघताय, याची नक्की काळजी घ्या!
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटना इतक्यात खूप प्रमाणात वाढल्या आहेत. फेसबुकवर फेरफटका मारताना अनेक पोस्ट अशा असतात की, युजर्स चटकन त्याकडे आकर्षित होत असतो, परंतु अशा पोस्ट धोकादायकही ठरू शकतात. कुठलाही विचार न करता क्लिक करणं म्हणजे आपलं अकाऊंट हॅकर्सच्या हाती देणं आहे... त्यामुळं काळजी घ्या...

स्लोवाकियामधील ‘अॅण्टीव्हायरस’ आणि ‘सिक्युरिटी ऑफ्टवेअर डेव्हलपर ईस्ट’नं एक यादी जाहीर केलीय. त्यात फेसबुक युजर्सनी कोणत्या पोस्टवर क्लिक करू नये याबाबत काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या गाईडलाईन्स

> ‘ऑनलाईन स्कॅम’ सगळ्यात जास्त ‘गिफ्ट कार्ड’च्या माध्यमातून पसरतो. ‘फेसबुक’वरही एखाद्या कंपनीनं खास ‘गिफ्ट कार्ड’ अथया ‘ऑफर’ची पोस्ट दिसत असेल तर चुकूनही क्लिक करू नका. तुमची पर्सनल डिटेल्स कंपनीकडं सुरक्षित होऊन जाते. त्यामुळं तुमचं मोठं नुकसानही होऊ शकतं.

> ‘फेसबुक’वर वजन घटविण्याबाबत काही पोस्ट देण्यात येतात. अशा प्रकारच्या पोस्टपासूनही सावध राहिले पाहिजे. अशा पोस्टवर क्लिक करताच हॅकर्सच्या जाळ्यात फसू शकतात. या पोस्टवर फ्री टिप्स आणि डायटिंग ऑफर्स दिल्या जातात.

> ‘फेसबुक’वर दिलेल्या जाणार्याज पेजवर क्लिक करण्यापूर्वीही खूप विचार करावा. अनेकदा घरबसल्या अडचणी येऊ शकतात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 13:37


comments powered by Disqus