Last Updated: Wednesday, September 25, 2013, 11:42
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने नोकिया सारखी मोबाईल कंपनी विकत घेतल्यानंतर आता तशीच काहीशी वेळ ब्लॅकबेरीवर आल्याचं समजतंय. फेअरफॅक्स नावाच्या कॅनडाच्या कंपनीनं ब्लॅकबेरी विकत घेण्याची तयारी सुरु केली आहे.
ब्लॅकबेरीच्या माहितीनुसार फेअरफॅक्स या ब्लॅकबेरी शेअर होल्डिंग कंपनीने ४.७अरब डॉलरला कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. महत्वाचं म्हणजे फेअरफॅक्सही कंपनी प्रेम वत्स यांनी स्थापन केली असून त्यांचा जन्म हैदराबादचा आहे.
एकवेळ अशी होती की 'नोकिया' कंपनी आघाडीवर होती. आर्थिक घडी विस्कटल्याने नोकिया अवघड परिस्थितीतून गेली. त्याचवेळी. नोकिया कंपनीने आपला गाशा गुंडाळण्याची धमकी भारताला भारताला दिली होती. त्यानंतर ही कंपनी डबघाईला आली होती. शेवटी नोकिया विक्रीला काढण्यात आली. `नोकिया`साठी `मायक्रोसॉफ्ट`ने बोली लावली. नोकियाला ७.२ अरब डॉलर देऊन मायक्रोसॉफ्टने खरेदी केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 11:35