Last Updated: Monday, January 6, 2014, 19:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी ब्लॅकबेरीने विक्री वाढवण्यासाठी आज स्मार्टफोन क्यू ५ ची किंमत २० टक्क्यांनी कमी केली आहे. या फोनची किंमत आता १९ हजार ९९० रूपये आहे, यापूर्वी या फोनची किंमत २४ हजार ९९० रूपये ठरवण्यात आली होती.
ब्लॅकबेरीला भारतीय बाजारात निर्माण झालेली स्पर्धा पाहुन या किंमती कमी करण्यात आल्याचा अंदाज आहे. कारण ब्लॅकबेरीची जागा आता सॅमसंग, आयफोन आणि झोलो सारख्या फोनने घेतली आहे.
कंपनीने दिलेल्या प्रेस नोटनुसार नवीन वर्षाच्या उत्साहपूर्ण वातावरणात ब्लॅकबेरीने बोनांझा ऑफर सुरू केली आहे. या योजनेनुसार स्मार्टफोन क्सू ५ सर्वांसमोर आलाय. नव्या किमतीनुसार ग्राहकांना हा फोन १९ हजार ९९०रूपयांना पडणार आहे.
कंपनीचे वितरण प्रमुख समीर भाटिया यांनी म्हटलं आहे, नवीन वर्षाच्या बोनांझा ऑफरनुसार ग्राहकांना एक चांगला मोबाईल फोन उपलब्ध करून देणे आहे. भारतीय बाजारात आपली स्थिती मजबूत आहे, हे सिद्ध करण्यासाठी ब्लॅकबेरीने हा फोन भारतीय बाजारात उतरवला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 6, 2014, 17:39