ब्लॅकबेरीच्या क्यू ५ ची किंमत २० टक्क्यांनी कमी

Last Updated: Monday, January 6, 2014, 19:01

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी ब्लॅकबेरीने विक्री वाढवण्यासाठी आज स्मार्टफोन क्यू ५ ची किंमत २० टक्क्यांनी कमी केली आहे. या फोनची किंमत आता १९ हजार ९९० रूपये आहे, यापूर्वी या फोनची किंमत २४ हजार ९९० रूपये ठरवण्यात आली होती.