ब्लॅकबेरी झेड ३० स्वस्त होणार! BlackBerry slashes Z30 price

ब्लॅकबेरी झेड ३० स्वस्त होणार!

ब्लॅकबेरी झेड ३० स्वस्त होणार!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

ब्लॅकबेरीच्या झेड १० या मोबाईल फोनला चांगलाच प्रतिसाद मिळत असतानाच, ब्लॅकबेरी इंडिया ही कंपनी ५ इंच स्क्रीनचा `झेड ३०` बाजारात आणत आहे. ब्लॅकबेरीचा झेड १० नंतर `झेड ३०` हा कमीकिमतीत मिळणार असल्याचं समजतंय.

ब्लॅकबेरी `झेड ३०` ची खासियत म्हणजे आतापर्यंतच्या ब्लॅकबेरी फोनमधील `सर्वांत मोठी स्क्रीन` असून ती ५ इंच आहे. फोनमधील कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि फ्रण्ट कॅमेरा २ मेगापिक्सल आहे. ८८० एएएचची बॅटरी, २५ तास चालू शकते कारण त्यामध्ये नवीन अॅन्टीना तंत्रज्ञान आहे असा, कंपनीचा दावा आहे.

मोबाईलमध्ये १.७ जीएचझेड क्वड-कोअर स्नॅपड्रॅगॉन असून, एस४ प्रोसेसरवर चालतो. २ जीबी रॅमसोबत इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे, त्याला ६४ जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच आता थर्ड पार्टी अॅप्सचे `झेड ३०` च्या बीबीएमवर नोटीफिकेशन मिळेल.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014, 13:44


comments powered by Disqus