Last Updated: Friday, November 22, 2013, 10:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईस्मार्टफोनच्या जमान्यात कॅनडाच्या हँडसेट कंपनी ब्लॅकबेरीनं पोर्शे डिजाइनसह एक नवीन आणि पूर्णपणे टचस्क्रिन असलेला स्मार्टफोन लाँच केलाय. पोर्शे डिझाइनचा पी ९९८२ हा लक्झरी स्मार्टफोन आहे. मात्र या स्मार्टफोनची किंमत किती ते अजूनही सांगण्यात आला नाहीय.
ब्लॅकबेरीनं आपल्या नव्या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य सांगताना असं म्हटलं की, १०.२ ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आलेला हा स्मार्टफोन उच्च गुणवत्ता देणारा आहे.
याव्यतिरिक्त कंपनीनं दुसरे ‘क्रोकोडाइल’ मॉडेलही बाजारात आणले आहे. या मॉडेलची फक्त ५०० फोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर हा स्मार्टफोन पोर्शे डिझाइन स्टोअर्स आणि रिटेलवर २१ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 10:48