`गुगल`च्या `लोगो`तील बदल तुम्हाला ओळखता येईल? Can you spot the change in Google`s logo?

`गुगल`च्या `लोगो`तील बदल तुम्हाला ओळखता येईल?

`गुगल`च्या `लोगो`तील बदल तुम्हाला ओळखता येईल?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गुगलने आपल्या लोगोत बदल केला आहे, मात्र हा बदल असा आहे की, तुम्ही तो सहज ओळखू शकत नाही, गुगलने एवढा छोटासा बदल का केला आहे, ते आपल्याला शोधूनच सापडणार आहे.

कारण हा बदल तुम्हाला सहज ओळखता येईल असं नाहीय. गुगलने इतका लहानसा बदल का केला, याचे अनेक तर्क लावले जात आहेत.

independent.co.uk ने दिलेल्या रिपोर्टनुसार `Google` लोगोलमधील लहान म्हणजे दुसरा `g` या अक्षराला `एक` पिक्सल डाव्याबाजूला सरकवलं आहे. तसेच `l` या अक्षरालाही `एक` पिक्सल खाली आणि `एक` पिक्सल डाव्या बाजूला सरकवलं आहे.

गुगलच्या लोगोमध्ये काय बदल करण्यात आले आहेत, ते तुम्हाला फोटोपाहूनच कळणार आहे. जीआयएफ फॉर्मेटमध्ये हा लोगो असल्याने तुम्हाला यातील बदल ओळखता येणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 28, 2014, 13:28


comments powered by Disqus