Last Updated: Wednesday, July 3, 2013, 17:38
www.24taas.com, झी मीडिया, लंडनसध्या मोबाईलचा जमाना आहे. अनेकांकडे किमान दोन तरी मोबाईल दिसून येतात. त्याची कारणे वेगळी असतील. मात्र, यातील एक कारण कॉमन आहे. ते म्हणजे एका मोबाईलची बॅटरी उतरली तर! त्यासाठी काळजी म्हणून दुसरा मोबाईल उपयोगी पडतो. काहीजण दोन मोबाईल बॅटरी जवळ बाळगून असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, मोबाईलची बॅटरी फुल चार्ज केली तर तिचे आयुष्य कमी होते.
तुमचा मोबाईल चांगला आणि बॅटरीचे आयुष्य चांगले राहावे यासाठी १०० टक्के बॅटरी चार्ज करता कामा नये. जर तुम्ही असं केलं नाही तर मोबाईल बॅटरीचे आयुष्य कमी करता. एका इंग्रजी वृत्तपत्राने असा दावा केलाय की, मोबाईल फोनची बॅटरी पूर्ण चार्ज करणे ठिक नाही. त्याच्या मते जर मोबाईल पन्नास टक्के चार्ज झाल्यनंतर त्याची चार्जिंग बंद केली पाहिजे. फोन जास्तीत जास्त चार्ज करणे म्हणजे त्याची बॅटरी लाईफ कमी होते.
आपण पूर्ण मोबाईल बॅटरी चार्ज करतो तेव्हा फोनची बॅटरी गरम होते आणि त्याची क्षमता कमी होत जाते. वृत्तपत्राचं असं म्हणणं आहे की, महिन्यातून एकापेक्षा अधिकवेळा मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज झाली की बॅटरी खराब होण्याची शक्याता असते. फोनच्या बॅटरीचे आदर्श तापमान १५ डिग्री सेल्सिअस आहे. आपण नेहमी बॅटरीचे तापमान २० ते २५ डिग्री सेल्सिअस राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपल्याला मोबाईल फोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर कमी कव्हरेज अथवा कव्हरेज नसलेल्या भागात फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवला पाहिजे. तसेच लोकेशन दाखविणारे अॅप्लिकेशन आणि जीपीएस सेवा यामुळे बॅटरी लाईफ कमी होते. त्यामुळे त्या वापरात नसताना मिनिमाइज करुन ठेवा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 3, 2013, 17:38