Last Updated: Friday, May 17, 2013, 19:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफेसबुकनं नुकतंच ‘गुगल ग्लास’साठी स्पेशल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. म्हणजेच, आता ‘गुगल ग्लास’ वापरताना फेसबुकचाही वापर करता येऊ शकतो.
‘गुगल ग्लास’च्या साहाय्यानं आता तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फेसबुकवर फोटो शेअर करू शकतात. या फेसबुक अॅप्लिकेशनमध्ये सध्या तरी बेसिक ऑप्शन दिले गेलेत. ‘गुगल ग्लास’चा वापर करणारे युजर्स फेसबूकवर कोणते ऑप्शन जास्त वापरतील, हे ध्यानात घेऊनच हे अॅप्लिकेशन बनवण्यात आलंय.
युजर्स ‘माय ग्लास’मध्ये ऑन ऑप्शनवर क्लिक करून फेसबुक अॅप्लिकेशन वापरू शकतात. उदाहरणार्थ गुगल ग्लासवरून फोटो काढू शकतात. आणि त्याला फेसबुक ऑडियन्स कार्डमध्ये स्वाइप करू शकतात. आता तुम्ही फेसबूकवर आपल्या मित्रांसोबत फोटो शेअर करू शकाल. फेसबुकवर शेअर केलेले फोटो न्यूज फीडमध्ये दिसू शकतील ज्याच्या टॅगलाईनमध्ये लिहिलेलं असेल ‘व्हाया गुगल ग्लास’.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 17, 2013, 19:43