सुसाट... एका सेकंदात करा ४४ HD चित्रपट डाऊनलोड , Fastest ever broadband speeds

सुसाट... एका सेकंदात करा ४४ HD चित्रपट डाऊनलोड

सुसाट... एका सेकंदात करा ४४ HD चित्रपट डाऊनलोड

www.24taas.com , झी मीडिया , लंडन

सेकंदा सेकंदाला तंत्रज्ञानात नवीन शोध लागत आहेत. भन्नाट वेगात आपण माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अनुभवत आहोत. एका सेकंदात ४४ हायडेफिनेशन चित्रपट डाऊनलोड होईल इतका हायस्पीड इंटरनेटच्या ब्रॉडबँडवर मिळू शकतो . ऐकायला अशक्य वाटणारी अशी गोष्ट प्रत्यक्षात आली आहे. ब्रिटनच्या ब्रिटिश टेलिकॉम आणि फ्रान्सची अल्काटेक ल्यूसेंट यांच्या एकत्रित प्रयत्नाने तंत्रज्ञानाची ही प्रगती करून दाखवली आहे.

गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटिश टेलिकॉम आणि एका फ्रान्सच्या कंपनीमधील २२५ मैल अंतरामध्ये केबल नेटवर्किंगद्वारे या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रिटन आणि फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

एका सेकंदात ४४ हायडेफिनेशन चित्रपट डाऊनलोड होईल इतका हायस्पीड इंटरनेटच्या ब्रॉडबँडवर मिळू शकतो. हा स्पीड म्हणजे १.४ टेराबाइट प्रतिसेकंद . सध्या आपल्या देशात १०.६ एमबीपीएचचा स्पीड आहे. म्हणजे नव्याने विकसित तंत्रज्ञान आपल्या स्पीडपेक्षा १८३५० पटीने जास्त आहे. एमबीपीएच परिमाणात प्रतिसेकंद १.४ टेराबाइट म्हणजे १८३५०१ एमबीपीएच प्रतिसेकंद असा हा वेग आहे. नव्या तंत्राज्ञानासाठी वेगळ्या पायाभूत सुविधांची गरज नाही. नेहमीच्याच केबल नेटवर्किंग ब्रॉडबँडवर हायस्पीड मिळू शकतो .


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 24, 2014, 20:35


comments powered by Disqus