Last Updated: Friday, January 24, 2014, 20:35
सेकंदा सेकंदाला तंत्रज्ञानात नवीन शोध लागत आहेत. भन्नाट वेगात आपण माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अनुभवत आहोत. एका सेकंदात ४४ हायडेफिनेशन चित्रपट डाऊनलोड होईल इतका हायस्पीड इंटरनेटच्या ब्रॉडबँडवर मिळू शकतो . ऐकायला अशक्य वाटणारी अशी गोष्ट प्रत्यक्षात आली आहे. ब्रिटनच्या ब्रिटिश टेलिकॉम आणि फ्रान्सची अल्काटेक ल्यूसेंट यांच्या एकत्रित प्रयत्नाने तंत्रज्ञानाची ही प्रगती करून दाखवली आहे.