गुगलवरून आता मोफत एसएमएस , Free SMS from Google

गुगलवरून आता मोफत एसएमएस

गुगलवरून आता मोफत एसएमएस
www.24taas.com, नवी दिल्ली

मोबाइल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकांना एसएमएसवर भरमसाठ सूट देतात. मात्र, त्यातही ग्राहकांकडून एसएमएससाठीचे पैसे कसे वसूल करायचे नवे फंडे या कंपन्यांकडे असतातच. मात्र, आता गुगलने एक पाऊल पुढे टाकत एसएमएस पाठवण्याची मोफत सोय केली आहे.

नवनवीन सेवा पुरवणाऱ्या गुगलने जीमेलवरून मोफत एसएमएस सेवा नुकतीच सुरू केली आहे. भारतासह ५१ देशांमध्ये गुगलने ही सेवा सुरू केली आहे. याआधी ही सेवा दक्षिण आफ्रिकेत सुरू होती. तुम्हाला मोफत एसएमएस पाठविण्यासाठी तुमचे जीमेल ई-मेल अकाऊंट असावे, अशी एकट अट आहे.

जीमेल अकाऊंटधारकांबरोबरच गुगल अॅ प्स वापरणाऱ्यांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. सर्व मोबाइलधारकांनाही ही सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती गुगलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कसा पाठवायचा एसएमएस?

- जीमेल अकाऊंटला जाऊन चॅटवर क्लिक करा
- त्या ठिकाणी तुम्हाला एसएमएस हा पर्याय दिसेल
- त्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीला एसएमएस पाठवायचा आहे त्याचा मोबाइल क्रमांक टाइप करा
- तिथे तुम्ही ज्या व्यक्तीला एसएमएस करत आहात त्याचे नाव व देश टाइप करा

दिवसाला गुगलने तुम्हाला ५० एसएमएस ‘क्रेडिट’ केले आहेत. म्हणजे तुम्ही इच्छुक व्यक्तीला एसएमएस पाठवला की त्याची संख्या ४९ होईल. तर समोरच्या व्यक्तीने एसएमएसला उत्तर दिल्यास पुन्हा क्रेडिटची संख्या ५० होईल. तसेच एसएमएसला उत्तर न मिळाल्यास क्रेडिटची संख्या घटत जाईल. क्रेडिट शून्य झाल्यास २४ तासांनी पुन्हा एक क्रेडिट वाढेल, अशी व्यवस्था जी मेलने केली आहे.

First Published: Friday, October 12, 2012, 15:43


comments powered by Disqus