फेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी, girl facebook account hack

फेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी

फेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी
www.24taas.com

फेसबुकवर आपलं एखादं वक्तव्य किंवा फोटो टाकल्यासा त्यावर चर्चेचा अक्षरश: फड रंगतो. त्यामुळे आपण काय अपलोड करतो याचं तारतम्य असणं गरजेचं असतं. मात्र धुळ्यात एका तरूणीचे फेसबुक अकांऊट हॅक करून त्या अकांऊटवर अश्लील मजूकर आणि फोटो टाकण्यात आले होते. तरूणीला ही गोष्ट कळताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

काही दिवसांपूर्वी या तरुणीने आपले फेसबुक अकाउंट ओपन केले असता हा तिला हा प्रकार लक्षात आला. याबाबत तिने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दिली.

सोशल नेटवर्किंग फे सबुकवरून अकाउंट ओपन करून गलिच्छ मजकूर प्रसिद्ध करण्याची घटनेनंतरही पोलिसांकडून मात्र गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांची वरिष्ठांकडून कानउघाडणी झाल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करणे भाग पडले.

First Published: Thursday, December 20, 2012, 16:11


comments powered by Disqus