Last Updated: Monday, October 29, 2012, 13:45
www.24taas.com, वॉशिंग्टनचांदीच्या काही वस्तू, दागिने तसंच भांडी न वापरता ठेवल्यानंतर चांदीची चमक नाहीशी होते. पण आता तसं काही होणार नाही. कारण संशोधकांनी चांदी या धातूवर संशोधन करून चांदीची चमक न जाण्यासाठी उपाय काढला आहे.
‘युनिवर्सिटी ऑफ मेरीलॅन्ड’मध्ये ‘मटेरिअल सायन्स अँड इजिनिअरिंग’चे प्राध्यापक ‘रे फॅनयुंफ’च्या नेर्तृत्वाखाली चांदीच्या वस्तूंची चकाकी जशीच्या तशी राहण्याचे उपाय शोधण्यासाठी बॉल्टीमोरमधील ‘द वॉल्टर्स आर्ट म्युझियम’ सोबत भागीदारी केली होती.
चांदीबाबतचे संशोधन केल्याने भावी पिढीसाठी ऐतिहासिक वास्तू जतन करता येऊ शकते, त्यांनाही देशाच्या पौराणिक वास्तूंची माहिती कळली पाहिजे यासाठी याचे संशोधन करण्यात आलंय.
संग्राहालयाचे संरक्षक या सर्व कलाकृतींवर तज्ज्ञ कलाकरांकडून नायट्रोसेल्युलोजचा लेप लावला जाणार आहे. यामुळे चांदीच्या वस्तू व्यवस्थित झाकल्या जातील आणि ३० वर्षानंतरही हा लेप काढून पुन्हा लावता येऊ शकतो.
First Published: Monday, October 29, 2012, 13:45