`गुगल`नं साजरी केली कलरफूल होळी! Google celebrates Holi with colourful doodle

`गुगल`नं साजरी केली कलरफूल होळी!

 `गुगल`नं साजरी केली कलरफूल होळी!

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

देशभरात होळीचा जल्लोष साजरा होत असताना, गुगल तरी कसं काय मागे राहील. गुगलनं रंगबेरंगी डुडल तयार करून होळी साजरी केलीय.

आज धुलिवंदनाच्यानिमित्तानं गुगल इंडियाच्या होमपेजवर डुडल दिसतंय. गुगलच्या डुडलमध्ये एक पिचकारी गुगल लोगोवर रंग टाकत आहे आणि गुगलचा सफेद लोगो निळा, गुलाबी, पिवळा, हिरवा रंगात रंगून गेलाय. डुडलवर `होळी: फेस्टिव्हल ऑफ कलर्स` आणि हिंदीमध्ये `होली: रंगों का त्योहार` लिहिलेलं दिसतंय. डुडलवर क्लिक केल्यावर होळीशी संबधित माहिती मिळते.

गुगलचं डूडल कोणताही अॅनिमेशन आणि व्हिडिओ नाहीय. गुगल इंडियानं अशाप्रकारचा डूडल काही पहिल्यांदा बनवलं नसून, याआधीही २००१,२०१० आणि २०११मध्येही बनवले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Monday, March 17, 2014, 14:57


comments powered by Disqus