‘गूगल हेल्प आऊट’ आजपासून सुरूGoogle offers live video chats on range of topics with new service

‘गूगल हेल्प आऊट’ आजपासून सुरू

‘गूगल हेल्प आऊट’ आजपासून सुरू
www.24taas.com, झी मीडिया, सॅन फ्रॅन्सिस्को

तुम्हाला जेवणापासून तर लग्नापर्यंत... प्रेमापासून ते आरोग्यापर्यंत कोणत्याही बाबतीत माहिती हवी असेल तर त्यासाठी गूगलनं एक नवी सेवा सुरू केलीय. ‘गूगल हेल्प आऊट’ द्वारे त्या त्या क्षेत्रातील संबंधित विशेषज्ञाकडून तुम्हाला योग्य सल्ला आणि माहिती मिळेल. यासाठी फी मात्र मोजावी लागणार आहे.

गूगलची व्हिडिओ चॅटिंगची अशाच प्रकारची सेवा गूगल हँगआऊट म्हणून आधीच उपलब्ध आहे. त्याच हँगआऊटचा वापर करुन हँगआऊटमधून आपण विचारलेल्या प्रश्नांना एक्सपर्ट उत्तरं देईल. विशेष म्हणजे तुम्ही प्रश्न विचाराला की तेव्हा एक्सपर्टनं दिलेलं फक्त तुम्हीच ऐकू शकता. त्यामुळं ती गुप्तताही गूगलनं सांभाळलीय.

आज लाँच करण्यात आलेली ‘गूगल हेल्प आऊट’ ही पूर्णपणे एक्स्क्लुझिव्ह आहे. गूगल हेल्प आऊटमध्ये पहिल्या टप्प्यात फॅशन आणि ब्युटी, फिटनेस आणि पोषक आहार, कॉम्प्युटर्स आणि इलेक्ट्रनिक्स, स्वयंपाक, शिक्षण आणि व्यवसाय संधी, आरोग्य आणि घरकाम किंवा बागकाम यासारख्या टॉपिक्सचा समावेश करण्यात आलाय. त्यासाठी गूगलनं वेगवेगळ्या क्षेत्रातील १००० तज्ज्ञांसोबत संपर्क केलाय.

जे एक्सपर्ट प्रश्नांची उत्तरं देतील, त्यांना फी द्यावी लागणार आहे. गूगलला या फीमधून २० टक्के वाटा मिळणार आहे. म्हणजे एखाद्या डॉक्टरला तुम्ही प्रश्न विचारला आणि त्यासाठी २०० रुपये फी दिली. तर त्यातील ८० टक्के एक्सपर्टचे आणि २० टक्के गूगलचे असतील. या सेवेला खूप प्रतिसाद मिळेल, अशी आशा गूगलनं व्यक्त केलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 5, 2013, 14:57


comments powered by Disqus