Last Updated: Wednesday, April 18, 2012, 09:36
मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर रात्र काढावी लागली. दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.