हॅपी बर्थडे फेसबुक!, happy birthday facebook

हॅपी बर्थडे फेसबुक!

हॅपी बर्थडे फेसबुक!
www.24taas.com, झी मीडिया, लॉस एन्जिल्स

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक या आठवड्यात आपला दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या दशकात `फेसबुक`नं अनेक उतार-चढाव पाहिलेत. त्याचप्रमाणे तरुणवर्गात अत्यंत लोकप्रियही ही वेबसाईट ठरलीय.

जगभरात याचे १.२ अरबपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. फेसबुकचा गेल्या काही वर्षांतील वाढत्या संख्येचा आलेख लक्षात घेता `फेसबुक` बंद होण्याची शक्यता कमी असल्याचं दिसतंय.

`फेसबुक` या कंपनीची स्थापना मार्क झुकरबर्ग यानं फेब्रुवारी २००४ रोजी केली होती. हावर्ड विश्वविद्यालयाच्या या विद्यार्थ्यानं वेगवेगळ्या लोकांमध्ये आपल्या अनुभवांना शेअर करण्यासाठी एक मंच तयार केला होता... हीच होती फेसबुक वेबसाईटची सुरुवात.

`मैत्री`ची एक वेगळीच नवी भाषा फेसबुकमुळे प्रस्थापित झाली... फेसबुक मैत्री हा शब्दही वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलाच गाजला. `फेसबुक`मुळे कोणतीही व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला फॉलो करून त्याचा मित्र बनू शकत होता. २०१३ साली फेसबुकनं ७.८७ अरब डॉलरची कमाई केली होती. ज्यामध्ये १.५ अरब डॉलर निव्वळ नफा होता.

`फेसबुक`मुळेच जगभरातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहभागी झालेला मार्क झुकरबर्ग मे महिन्यात आपला ३० वा वाढदिवस साजरा करणार आहे. एकीकडे फेसबुक घरा-घरांत लोकप्रिय होताना दिसतंय. तिथंच अमेरिकेतली युवा पिढी मात्र याच फेसबुकपासून दूर जाताना दिसतेय. ते `फेसबुक`मध्ये काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.

एका रिपोर्टनुसार, जानेवारी २०११ पासून जानेवारी २०१४ या कालावधीत १३ ते १७ वर्ष वयोगटातील ३० लाखांपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी आपलं `फेसबुक` अकाऊंट बंद केलंय. १८ ते २४ वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्येही हीच गोष्ट आढळून आलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 16:08


comments powered by Disqus