Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:08
www.24taas.com, केम्ब्रिजफेसबुक वर तुम्ही कुठकुठल्या कम्युनिटींना ‘लाइक’ करता यावरून तुमचा स्वभाव आणि तुमचं व्यक्तिमत्व ओळखता येतं. आपली राजकीय विचारधारा, लैंगिकता, सहिष्णुता यांसारख्या गोष्टी फेसबुक लाइकवरुन ओळखता येतात.
केम्ब्रिज विश्वविद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे की, फेसबुक लाइकवरून धर्म, वंश आणि लैंगिकता यांच्याबद्दल अनुमान काढता येऊ शकतं. ‘पीएसएनएस’ नामक एक जर्नलमध्ये यासंदर्भात लेख छापून आला आहे. या लेखात दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांच्या फेसबुक लाइक्सवरुन अनुमान अभ्यासकांनी काढलं होतं,
त्याची पडताळणी केल्यावर ९५% माहिती योग्य असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र या संशोधनाला विरोधही मोठ्या प्रमामावर होत आहे. या संशोधनाला विरोध करणार्या डेव्हिड स्टीलवेल यांच्या मते फेसबुकवर ज्या गोष्टी तुम्ही लाइक करता, त्या सार्वजनिक होऊ नयेत. त्यासाठी प्राइव्हसी सेटिंग्स असावीत आणि त्यात आवश्यक तो पर्याय असावा.
First Published: Tuesday, March 12, 2013, 17:08