Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:15
www.24taas.com, कोलकाताभारतातील मोबाइल फोन वापरणारे ५० टक्के लोक हे सुरक्षेच्या उपायाविनाच मोबाइल फोनचा वापर करीत आहेत. नुकतचं सायबर सुरक्षेशी संबंधित कंपनी सायमेंटेकच्या मते विनासुरक्षा मोबाइल फोन वापरणारे लोक हे सायबर क्राईमचे जास्तीत जास्त गुन्हेगार होताना दिसतात.
कमीत कमी ४४ टक्के लोकांना अनोळखी नंबरहून एसएमएस मिळतो. ज्यात ध्वनी संदेश ऐकण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितले जाते. सायमेटेक रिपोर्टनुसार भारतात जवळजवळ ७० टक्के वयस्कर लोक हे इंटरनेट सेवेसोबतच मोबाइलचाही वापर करतात. सायमेटेक सॉफ्टवेअरचे राष्ट्रीय प्रबंधक रितेश चोप्रांच्या मते, आर्थिक लोभापायी अशा अनेक गोष्टींना लोक बळी पडतात.
त्यांनी सायबर अपराधापासून वाचण्यासाठी आग्रह केला आहे. या अशा एसएमएसमुळे उपभोक्त्याची खाजगी माहिती चोरली जाण्याची शक्यता असते, आणि ज्यामुळे पुढे त्या गोष्टी जास्त खतरनाक होण्याची शक्यता असते. अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता असणे गरजेचे असते. या वर्षी एप्रिल महिन्यात सायमेटेक कंपनी ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या विषयावर माहिती देणार आहे.
First Published: Wednesday, March 13, 2013, 15:34