Last Updated: Tuesday, January 28, 2014, 13:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई जापानची दुचाकी कंपनी सुझूकी मोटारसायकलनं आज दोन नवी उत्पादनं बाजारात उतरवली आहेत. यामध्ये एक स्कूटर आणि एक मोटारसायकलचा समावेश आहे.
जगाभरातील सर्वांत मोठ्या दुचाकी वाहन कंपनीमध्ये सुझूकी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखली जाते. बाजारातील आपला हिस्सा वाढवण्यासाठी कंपनी या वर्षांत आणखी दोन आणखी उत्पादनं बाजारात आणण्याच्या प्रयत्नात असेल. देशातील दुचाकी स्कूटर बाजारात कंपनीचा हिस्सा १६ टक्के आहे तर मोटारसायकलमध्ये मात्र या कंपनीचा हिस्सा अजूनही अवघा एका टक्क्यांवर आहे.
नुकत्याच लॉन्च केलेल्या `लेटस्` या स्कूटरच्या प्रचारासाठी कंपनीनं परिणीती चोपडा हिला सहभागी केलंय. तर गेल्या दोन वर्षांपासून कंपनीनं सुपरस्टार आणि दबंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला आपला ब्रांड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलंय. त्यामुळे नवीन मोटारसायकल `गिक्सर`च्या उद्घाटनप्रसंगी दबंग सलमानही हजर होता.
सुझूकी मोटारसायकल इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष अतुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅलेंडर वर्षांमध्ये सुझूकी चार नवी उत्पादनं बाजारात आणणार आहे, यातील दोन उत्पादनं नुकतीच ग्राहकांसमोर सादर करण्यात आली आहेत.
नवं स्कूटर मॉडेल पुढच्या महिन्यात बाजारात दिसेल तर नवीन मोटारसायकल जुलैपर्यंत बाजारात दाखल होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 13:32