Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:10
www.24taas.com, नवी दिल्ली कम्प्युटर निर्माती कंम्पनी लिनोवोनं सोमवारी पर्सनल कम्प्युटरचे तब्बल १८ नवे मॉडेल लॉन्च केलेत. ‘विंडोंज ८’ या आधुनिक ऑपरेटींग सिस्टमसहित हे कम्प्युटर्स लॉन्च करण्यात आलेत. सहा वेगवेगळ्या सीरिजमधील हे सर्व मॉडेल्स ग्राहकांच्या सर्व मागण्या विचारात घेऊन बनवले गेलेत, असा दावा कंपनीनं केलाय. या कम्प्युटरची किंमत सुरू होते २१,९९० रुपयांपासून सुरू होते.
‘ऑल इन वन’ असलेल्या या कम्प्युटर्सच्या फिचर्समध्ये ’१० फिंगर मल्टी टच’चाही समावेश करण्यात आलाय. सोमवारी लॉन्च झालेल्या मॉडेल्समध्ये लिनोवो आयडिया सेंटर ए ७२०, आयडिया सेंटर बी ३४०, आयडिया सेंटर बी ५४०, आयडिया सेंटर सी २४०, आयडिया सेंटर सी ३४० और आयडिया सेंटर सी ४४० या कम्प्युटर्सचा समावेश आहे.
‘ए’ सीरिजच्या कम्पुटर्सची किंमत १,१५,९९० रुपयांपासून सुरू होते तर ‘बी’ सीरिजच्या कम्प्युटर्स ३४,९९० रुपये आणि ‘सी’ सीरिजचे कम्प्युटर २१,९९० रुपयांपासून सुरू होतात.
म्हणजेच ‘सी’ सीरिज ही लिनोवोचे स्वस्त कम्प्युटर्स आहेत. ‘सी २४०’ चं स्क्रीन १८,५ इंचाचं आहे यामध्ये इंटेल सेलेरॉनचं डुअल प्रोसेसर वापरण्यात आलंय.
First Published: Tuesday, March 26, 2013, 11:09