Last Updated: Friday, February 14, 2014, 13:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअरे माझ्या बाबांना फोनचं काही कळत नाही... त्यांना फक्त फोन घ्यायचा आणि करायचा एवढचं ऑप्शन पाहिजे... पण फोन जास्त महाग नको.... अशी काहीशी परिस्थिती प्रत्येक दुसऱ्या घरात आढळते. याच परिस्थितीचा फायदा घेत पॅनसॉनिक कंपनीने नुकतेच आपले दोन फिचर फोन लॉन्च केले आहे. EZ180 आणि EZ240 असे या फोनची नावं असून ते २००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
लॉन्च झालेल्या दोन्ही फोनमध्ये देवनागरी फॉन्ट आहे त्यामुळे तुम्हांला मराठी आणि हिंदी टाइप करता येणार आहे. या खेरीज आणखी नवे फिचर या फोनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॅनसॉनिकच्या EZ180 आणि EZ240 या फोनमध्ये मोबाईल ट्रॅकर ऐप्लिकेशन आहे.
या दोन्ही फोनला अल्फान्युमरिक की-बोर्डला सपोर्ट करत होती. स्क्रिन सोडली तर दोन्ही फोन एकसारखेच दिसतात.
दोघांची वैशिष्ट्ये
* अल्फान्यूमरिक की-बोर्ड
* प्राइमरी कॅमरा *
मेमरी कार्डच्या मदतीने 16 GB पर्यंत वाढवता येते
* GPRS, ब्लूटूथ
* LED टॉर्च
* फोनपासून वेगळी होणारी बॅटरी EZ240
* 2.4 इंचचा डिस्प्ले स्क्रीन
* 1.3 मेगापिक्सलचा कॅमेरा
* 1200 mAh च्या बॅटरीने फोन संपूर्ण एक दिवस सुरू राहतो.
* फोन ग्रे, ब्लू, व्हाइट रंगात
* एफ एम रिकॉर्डिंग
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 13:17