Last Updated: Monday, August 19, 2013, 22:08
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्कफेसबूकवरील सिक्युरीटी संदर्भात एका युझरनं अनेकदा कंपनीला कळवलं. पण कंपनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या युझरने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गचं अकाउंट हॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे आता फेसबुकच्या सेक्युरिटीवर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे.
फिलिपाइन्सच्या खलील या फेसबूक युझर्सने हा प्रकार केला आहे. कोणत्याही वाईट कामासाठी मी अकाउंट हॅक केलेले नाही, असे त्याने नंतर स्पष्ट केले आहे. फेसबूकने माझे म्हणणं ऐकलं नाही म्हणून मला हा पर्याय निवडावा लागत असल्याचे खालिलने म्हटले आहे. फेसबूकवर सर्फिंग करताना खलिलला फेसबूकमध्ये असा `बग` सापडला ज्याद्वारे कुणीही कुणाच्याही अकाउंटमधून दुसऱ्याच्या फेसबूक वॉलवर पोस्ट करु शकतं. याबद्दल खालिलने अनेकदा फेसबूकला मेल आणि मेसेज पाठवून माहिती दिली. मात्र त्यावर काहीच उत्तरही आले नाही. तसेच ही त्रूटी किंवा बगही काढण्यात आला नाही. त्यामुळे खलीलने थेट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे अकाउंट हॅक करुन त्याच्याच वॉलवरुन ही माहिती पोस्ट करुन फेसबूकला जोर का झटका दिला.
`माझे नाव खलील असून माझ्याकडे माहिती तंत्रज्ञानची बीए डिग्री आहे. मला फेसबूकवर एक बग सापडला असून त्या बगच्या मदतीने फेसबूक यूझर्स दुसऱ्या कोणत्याही यूझरच्या वॉलवरुन लिंक शेअर करु शकतो. मी याची चाचणीही करुन पाहिली आहे. त्यात मला यशही आहे. त्यामुळे कृपया तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी माझी विनंती आहे`, असा संदेश खालिलने काही दिवसांपूर्वी फेसबूकच्या सुरक्षा विभागाला पाठवला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 19, 2013, 22:06