Last Updated: Wednesday, June 18, 2014, 17:09
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई‘मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300’ या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग साईटवर सुरू झालीय. कंपनीनं अजून याबद्दल जाहीर केलं नसलं, तरी ऑनलाइन शॉपिंग साईट इंफीबीमवर हा स्मार्टफोन २४,००० रुपयांना विकला जातोय.
मायक्रोमॅक्सनं दोन दिवसांपूर्वीच दोन स्वस्त विंडोजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास गोल्ड A300मध्ये ५.५ इंचीची पूर्ण एचडी (१९२०X१०८० पिक्सेल्स)चा डिस्प्ले आहे. यात २ गीगाहर्ट्स ऑक्टा-कोअर प्रोसेसर आणि २ जीबी रॅम आहे. हा अँड्रॉईड ४.४.२ किटकॅटवर चालतो. तसंच ड्यूअल-सिम सपोर्टही हा स्मार्टफोन करतो.
फोनमध्ये १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. बॅटरी २३०० mAh ची आहे. कंपनीच्या अनुसार एक वेळा चार्ज केल्यानंतर याच्या बॅटरीद्वारे ८ तासापर्यंत टॉक टाईम आणि २१० तासांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळतो. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये जीपीएस, ब्लूटूथ ४.०, वाय-फाय, जीपीआरएस, एज, 3G आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 17:09