कॉलेजांमध्ये बसवणार मोबाईल जॅमर! Mobile jamers in Colleges

कॉलेजांमध्ये बसवणार मोबाईल जॅमर!

कॉलेजांमध्ये बसवणार मोबाईल जॅमर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्य सरकार सध्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या विचारात आहे. मात्र, याला विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विरोध होत असल्याचंच दिसतय.

क्लासरुम असो, कँटीन असो वा कॉलेज कॅम्पस असो..इकडे जो तो बीझी असतो तो फोनवर..कुठे गेमचे क्लासेस चालतात तर कुठे फ्लॅश सुरु असतात...क्लास सुरु असतानादेखिल पहिल्या बेंचचा संदेश हा शेवटच्या बेंचवर एसएमएसने पोहचत असतो..आता मात्र यावर बंदी येऊ शकते..कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या तयारीत शिक्षण विभाग सध्या आहे. मात्र, ही चर्चा सुरु होताच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

यासाठी प्राचार्य आणि प्राध्यापकांकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. मुळातच मोबाईल जॅमरमुळे प्राध्यपकांच्या मोबाईल वापरण्यावर आणि संपर्क आणि समन्वय साधण्यात अडचणी येणार तसंच अशी बंदी आणून आपण कुठल्या दिशेने जात असल्याचा प्रश्न देखिल उपस्थित केला जातोय.

मोबाईलचा गैरवापर तर होतोच शिवाय त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्षदेखील विचलीत होतं मात्र, या कारणांमुळे मोबाईलवर बंदी आणायची की की त्याचा गैरवापर करणे थांबवायचे याचा विचार सर्वच स्तरावर होणं गरजेचं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 8, 2013, 17:21


comments powered by Disqus