Last Updated: Saturday, January 19, 2013, 15:26
www.24taas.com, नवी दिल्ली मोबाईल कंपनी नोकियानं आपला सर्वात कमी किंमतींच्या मोबाईलमध्ये आता आणखी एका नव्या डबल सिमकार्डधारक मोबाईलचा समावेश केलाय. हा फोन आहे नोकिया ११४... नुकतंच या फोनचं लॉन्चिंग पार पडलं.
या फोनची किंमत आहे फक्त २,५४९ रुपये. महत्त्वाचं म्हणजे, या फोनमध्ये तुम्हाला सोशल नेटवर्किंग अॅप्लीकेशन फेसबूक आणि ट्विटर डाऊनलोड करावे लागणार नाहीत. कारण, हे काम कंपनीनंच केलंय. फेसबूक आणि ट्विटर तुम्हाला फोनमध्ये आयतं मिळणार आहे.
या फोनमध्ये एक्सप्रेस ब्राऊजर असल्यानं इतर साधारण मोबाईलपेक्षा या मोबाईलमध्ये ब्राऊजिंग ८५ टक्के गतीनं होऊ शकते, असा दावा कंपनीनं केलाय. एकाच वेळी दोन सिमकार्डची क्षमता असलेल्या या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोकिया इझी स्वॅप टेक्नॉलॉजीवर हा फोन आधारित आहे. याबरोबरच ‘नोकिया स्टोअर’च्या अॅप्लिकेशनच्या मदतीनं तुम्ही आणखी बऱ्याच काही गोष्टी डाऊनलोडही करू शकता.
नोकिया ११४ च्या काही खास गोष्टी डिसप्ले – १.८ इंच QVGA
कॅमेरा – .३ मेगापिक्सल
ड्युएल सिम (GSM+GSM)
३२ जीबी एक्सपेन्डेड मेमरी
ब्लू टूथ सपोर्ट २.१
रेडिओ
नोकिया स्टिरिओ WH-102
First Published: Saturday, January 19, 2013, 11:26