Last Updated: Tuesday, April 15, 2014, 15:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनोकिया X ड्यूअल-सिम स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता याची किंमत ७७२९ रुपये झाली आहे. ऑनलाइन रिटेलर्सकडे याची किंमत सुमारे ७२०० च्या आसपास आहे. नोकियाचा अँड्रॉइड फोन आहे.
गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन भारतात ८५९९ रुपयांना लॉन्च केला होता.
नोकिया X च्या कमी किंमतीमुळे असे म्हटले जाते की या सीरीजनंतर आणखी दोन फोन नोकिया X+ आणि नोकिया XL ची विक्री लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे
नोकिया X मध्ये 800x480 पिक्सल्स रेज्युलूशनचा ४ इंच का आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. एक गीगाहर्त्ज ड्यूल-कोर क्वॉलकॉम स्नैपड्रॅगन प्रोसेसर आहे. यात 512 एमबी रॅम आहे. 32 जीबीपर्यंत मेमरी कार्ड टाकू शकतो. मागील बाजूस 3 मेगापिक्सल्सचा कॅमरा आहे. फ्रंट कॅमरा नाही आहे.
याची लांबी, रुंदी आणि जाडी 115.5 x 63 x 10.4 मिलीमीटर आहे. वजन 128.66 ग्रॅम आहे. बॅटरी स्टँडबाय टाइम 2G वर 28.5 दिवस आणि 3G वर 22 दिवस आहे. टॉक टाइम 2G वर 13.3 तास आणि 3G वर 10.5 तास आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 15, 2014, 15:25