Last Updated: Sunday, January 26, 2014, 18:58
www.24taas.com झी मीडिया , मुंबईरिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने रिक्षा परमिट आता उपलब्ध होणार आहे. परवाना अर्ज हा ऑनलाईन भरावा लागणार आहे. सोमवारी २७ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.
याआधी रिक्षा परमिटवर बंदी घालण्यात आली होती. सर्वाधिक मागणी ही मुंबई आणि उपनगरातून आहे. त्यानंतर रत्नागिरी आणि पनवेल येथून आहे. ऑनलाईन पेमेंट भरण्याची सुविधा दि. २७ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे तर विनापरतावा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शुल्क १००रूपये असणार आहे.
अधिक माहिती
https://autopermit.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 18:32