Last Updated: Sunday, May 19, 2013, 10:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अॅपलने आपला आयफोन-५ दाखल केल्यानंतर सोनी कंपनीनेही एक पाऊल टाकत स्मार्टफोन बाजारात आणला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी ५१ वाचा स्मार्टफोन लाँच केलाय.
आगामी वर्षभर स्मार्टफोनचे ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी तब्बल २०० कोटी रूपये खर्च करणार आहे. २०१५पर्यंत कंपनीला भारतातून मिळणार्या एकूण उत्पन्नापैकी ५० टक्के वाटा स्मार्टफोन आणि टॅब्लेट श्रेणीचा असेल, असा विश्वास पॅनासॉनिक कंपनीने व्यक्त केलाय.
ऑगस्ट महिन्यापर्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच केले जातील. या उत्पादनांच्या किमती ६,९९० ते ३५,००० रुपयांपर्यंत असतील. त्याची किंमत २५,९०० रुपये आहे. पुढील आठवड्यात तो बाजारात उपलब्ध होणार आहे. पी-५१ च्या मार्केटिंगसाठी कंपनीने जेना समूहासोबत करार केला आहे.
स्मार्टफोनची वैशिष्ट्येअँड्रॉइड जेलिबीन ४.२ ऑपरेटिंग सिस्टिम
८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा विथ एलईडी फ्लॅश
१.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (व्हिडिओ कॉलिंगसाठी)
५इंच एचडी आयपीएस डिस्प्ले
१.२ गीगाहर्ट्झ स्पीडचा क्वॉडकोअर प्रोसेसर
२ जी आणि ३ जी सपोर्ट
हिंदी भाषेला सपोर्ट
२५००एमएचची बॅटरी
ड्युअल सिम कार्ड
४ जीबी इंटर्नल ३२जीबी एक्स्टर्नल मेमरी
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 19, 2013, 10:06