आकाश-3 टॅब्लेटमध्ये सिम कार्डसाठी जागा, place to Aakash in Sim Card

आकाश-3 टॅब्लेटमध्ये सिम कार्डसाठी जागा

आकाश-3 टॅब्लेटमध्ये सिम कार्डसाठी जागा
www.24taas.com,नवी दिल्ली

स्वदेशी बनावटीचा सर्वात स्वस्त आकाश टॅब्लेट बाजारात दाखल झाला आहे. मात्र, आकाश टॅब्लेटमध्ये नवनविन बदल करण्यात येत आहे. आता तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या बदलानुसार आकाश-३ टॅबमध्ये सिम कार्डसाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आकाश टॅबमध्ये विविध सुविधा देण्यावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आकाश-३ पुढील सत्रात उपलब्ध करून दिला जाणार आहे. आकाश तीन हा अनेक सुविधा उपयुक्त असणार आहे. फेब्रुवारीमध्ये आकाश-३ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

आकाश टॅब्लेट हा संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोग व्हावा, याच उद्देशाने तो बनविण्यात आला आहे. त्यानुसार बदल कऱण्यात येत असल्याची माहिती, आकाशवर काम करणाऱ्या समितीतील सदस्य आणि मुंबईमधील आयआयटीतील संगणक विज्ञान आणि तंत्रणज्ञान विभागातील (IIT Computer Science and Technology) प्राध्यापक दीपक पाठक यांनी दिली.

आकाश -३मध्ये लिनक्स आणि एन्ड्रॉईड संबंधीत प्रणाली आहे. त्यामुळे आकाशची मेमरी (क्षमता) अत्याधुनिक बनविण्यावर भर आहे. त्यामुळे सिम कार्डसाठी जागा ठेवण्याचा संकल्प केला गेला. त्यामुळे कम्युनिकेशनसाठी (Communication Equipment) याचा चांगला उपयोग होण्यास मदत होईल, असे पाठक यांनी स्पष्ट केले.

आयआयटी मद्रास येथील प्राध्यापक अशोक झुनझुनवाला यांनी आकाश-३ साठी काम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना तेथील शेकडो विद्यार्थी मदत करीत आहेत. हा आकाश-३ शिक्षणातील नवी क्रांती असेल. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी याचे चांगले योगदान असणार आहे.

First Published: Tuesday, January 1, 2013, 13:57


comments powered by Disqus