गुगलकडून `अश्लील`तेवर बंधनं, porn photo video on google search

गुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा

गुगलकडून अश्लीलतेवर बंधनं... आंबटशौकीनांची निराशा
www.24taas.com, मुंबई

यापुढे गुगलवर आंबटशौकीनांना ‘तसे’ फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पाहायचा असेल तर तसं स्पष्टपणे कमांड गुगलला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही एखादी गोष्ट सर्च करत असताना उगाचच तुम्हाला नको असलेले अश्लील फोटो तुमच्या समोर येणं बंद होणार आहे.

इंटरनेटचा वापर जितका माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी होतो तितकाच किंवा किंबहुना त्यापेक्षाही अधिक तो आंबटशौकिनांकडून पॉर्नोग्राफिक किंवा अश्लील साहित्य पाहण्यासाठी केला जातो. कित्येकदा गुगलसारख्या सर्च इंजिनवर काही ठराविक नावाने सर्च करत असताना त्याच्याशी मिळत्याजुळत्या नावाचे अश्लील फोटोदेखील मिळतात. यावर उपाय म्हणून गुगल या सर्च इंजिनने आपल्या वेबसाइटवर अश्लील फोटो शोधण्याची प्रक्रिया आता थोडी अवघड केली आहे. आता शक्यतो सामान्य फोटो शोधताना त्याबरोबर अश्लील फोटोही येणार नाहीत.

अश्लील फोटो शोधायचे असल्यास आपल्या सर्चसाठी अधिक तपशीलात जाऊन किंवा ठळकपणे तसे नमूद करावे लागेल, असे गुगलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ‘आम्हाला गुगलचा वापर करणाऱ्यांपासून काहीही लपवून ठेवायचे नाही. त्यांना हवी ते माहिती ते मिळवू शकतील. पण आता त्यासाठी तशा विशिष्ट शब्दांत सर्च करावी लागेल’ असं कंपनीनं स्पष्ट केलंय. Google.co.in या गुगलच्या भारतीय आवृत्तीवर हा बदल लागू झाला नसला तरी गुगलच्या google.com .com या आंतरराष्ट्रीय साईटवर हा बदल कंपनीनं लागू केलाय. भारतातही लवकरच हे नियम लावण्यात येणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

First Published: Saturday, December 15, 2012, 19:04


comments powered by Disqus