Last Updated: Monday, June 17, 2013, 21:01
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमोबाईलधारकांसाठी एक खुषखबर. आता रोमिंग स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने रोमिंगच्या दरात घट केली आहे. कॉलदरांबरोबरच एसएमएसमध्येही ही घट होणार आहे. मात्र रोमिंगचे नवीन दर पुढल्या महिन्यात म्हणजेच जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत.
आता मोबाईलधारकांना लोकल आऊटगोईंगसाठी १ रुपया, इनकमिंगसाठी ७५ पैसे आणि एसटीडीसाठी दीड रुपये आकारले जाणार आहेत. तर रोमिंग एसएमएसमध्येही घट करण्यात आली आहे. लोकल एसएमएससाठी १ आणि एसटीडी एसएमएससाठी दीड रुपये आकारले जाणार आहेत.
‘ट्राय’ने देशभऱातील रोमिंगसेवेवरील स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्स आणि कॉम्बो व्हाऊचर्सला मान्यता दिलीय. रोमिंग दरामध्ये केलेल्या कपातीमुळे महागाईने बेजार झालेल्या नागरीकांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 21:01