स्थिर सरकार देणार २० लाख नोकर्‍या Stable government will gives job

स्थिर सरकार देणार २० लाख नोकर्‍या

स्थिर सरकार देणार २० लाख नोकर्‍या
www.24taas.com, झी मीडिया

येत्या काही महिन्यात तब्बल २० लाख नोकर्‍या तयार होण्याचा अंदाज मनुष्यबळ विकास सल्लागार आणि अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. निवडणुकीतही प्रचंड मनुष्यबळाची गरज भासणार असल्यामुळे जॉब मार्केटची टक्केवारी देखील वाढणार आहे.

जॉब मार्केटचा सकारात्मक बदल हा या वर्षीपासुनच चांगला दिसला आहे, असे ग्लोबल इंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील गोयल यांनी सांगितले. स्थिर सरकार आल्यास रोजगाराची भरभराट होऊ शकते. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.

स्थिर सरकार आल्यानंतर लाखो लोकांना कायमस्वरुपी नोकर्‍या मिळतील. द मॉन्स्टर डॉट कॉमने केलेल्या सर्व्हेतही जॉब मार्केटची भरभराट दिसत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 7, 2014, 14:51


comments powered by Disqus