Last Updated: Thursday, June 12, 2014, 22:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसध्या सगळीकडचं सोशल मिडियाची क्रेझ दिसून येतंय. यामध्ये विद्यार्थीही मागे राहिले नाहीत.
टीसीएसनं घेतलेल्या सर्व्हेनुसार सोशल मिडियामध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंत ही फेसबूक राहिली आहे. तर 10 पैकी 7 विद्यार्थी ऑनलाईन शॉपिंग करतात. विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही सॅमसंग फोनला आहे.
देशातल्या 12 शहरांमधील 600 शाळा आणि कॉलेजमधील 12 ते 18 वयोगटातल्या 18 हजार विद्यार्थ्यांचा सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये शहरातील दहापैकी नऊ विद्यार्थी मोबाईल फोन वापरतात.
तर 76 टक्के विद्यार्थी हे फेसबूक वापरत असून 48 विद्यार्थी दिवसांतून एकदा तरी फेसबूकवर पोस्ट टाकतात.
विद्यार्थ्यांमध्ये गुगल आणि ट्विटरही लोकप्रिय होत असले तरी ऑर्कूट मात्र आता इतिहासजमा झाले आहे.
87 टक्के विद्यार्थ्यांना वाटते की, सोशल मिडियाच त्यांना चालू घडामोडीविषयी अपडेट ठेवते.
तसंच 10 पैकी 7 विद्यार्थी ऑनलाईन शॉपिंग करतात. विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही सॅमसंग फोनला आहे.
तर करिअर निवडताना त्यांची पहिली पसंती आयटीला असून त्यानंतर इंजिनिअरिंग, मिडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 22:20