तुमचं फेसबुकचं अकाऊंट हॅक होईल, पण काळजी नाही - Marathi News 24taas.com

तुमचं फेसबुकचं अकाऊंट हॅक होईल, पण काळजी नाही

www.24taas.com, लंडन
 
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकच्या सुऱक्षेला आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या ९० करोड युजर्संकडून त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मागितला आहे. ब्रिटन मधील डेली मेल या वृत्तपत्रातील बातमीनुसार फेसबुकचे पासवार्ड सतत हॅक होतात. आणि त्यामुळे यालाच आळा घालण्यासाठी फेसबुकवरील त्याच्या युजर्सकडून मोबाईल नंबर मागितला आहे.
 
फेसबुकच्या लाखो युजर्सच्या पेजवर एक लिंक येत आहे. ज्यावर युजर्संना फेसबुकसाठी त्यांच्या अकांऊटच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी सांगण्यात येत आहे. त्या लिंकवर क्लीक केल्यास फेसबुकच्या सिक्युरिटीचं पेज ओपन होतं. काही सोपस्कारानंतर फोन नंबर टाकण्यास सांगितलं जातं. फेसबुकच्या म्हणण्यानुसार जर युजरचा पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास सगळे पासवर्ड डिलीट होतात.
 
आणि त्या फेसबुक युजर्सजवळ त्याला त्यांच्या मोबाईलवर तसा एसएमएस मिळतो. ज्यात तुम्हांला सांगितलं जातं की, तुमचा पासवर्ड बदलण्यात आला आहे. फेसबुकचं म्हणणं आहे की, अशाने हॅकर्सना नक्कीच आळा बसेल.
 
 
 
 

First Published: Wednesday, June 20, 2012, 16:40


comments powered by Disqus