Last Updated: Wednesday, December 14, 2011, 17:27
झी २४ तास वेब टीम, मुंबई जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटचे निर्माते डाटाविंडने ३०,००० टॅबलेटची प्रत्येकी २५०० रुपये किंमतींनी ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ऑनलाईन ऑर्डर नोंदवल्या नंतर सात दिवसात डिलिव्हरी देण्यात येणार आहे. ऍण्ड्रॅईड २.२ ही सात इंचाची टॅबलेट aakashtablet.com. या पोर्टल उपल्बध करुन देण्यात आली आहे. सध्या ३०,००० टॅबलेटस ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि डिलिव्हरीच्या वेळेस पैसे द्यायचे आहेत.
विक्री पूर्व तब्बल चार लाख टॅबलेटसचे बुकिंग झाले असून सध्या ही ऑनलाईन विक्री वैयक्तिक खरेदीदारांसाठी असल्याचे डाटाविंड संस्थापक आणि सीईओ सुनीत सिंग तुली यांनी सांगितलं. युबीस्लेट 7 या वेगवान प्रोसेसर असलेलं आकाश टॅबलेट जानेवारी महिन्याच्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध होईल. सध्याच्या आकाशमध्ये प्रोसेसरची क्षमता ३६६ मेगा हर्ट्झची आहे. युबीस्लेटची ३००० रुपयांना ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, December 14, 2011, 17:27