आता पासवर्ड सेव्ह होणार मेंदूत! - Marathi News 24taas.com

आता पासवर्ड सेव्ह होणार मेंदूत!

www.24taaas.com, लंडन
 
काँप्युटर, इमेलचा पासवर्ड विसरून चालेल का? हो.. चालेल... कारण स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीने एक अशी यंत्रणा विकसित केली आहे, ज्याद्वारे कुठलाही पासवर्ड तुमच्या मेंदूतील एका अशा भागात साठवला जातो, जो भाग इतरवेळी सहसा वापरत नाहीत. म्हणजेच तुम्ही तो पासवर्ड विसरून गेलात, तरी काही फरक पडत नाही. मात्र, तुम्हाला आवश्यक असेल, तेव्हा तो पासवर्ड सहज तुम्हाला आठवतो.
 
बऱ्याचशा युजर्सना आपला पासवर्ड विसरण्याची किंवा तो सोपा असल्यास पासवर्ड हॅक होण्याची भीती असते. या नव्या यंत्रणेनुसार युजर आपला पासवर्ड आपल्या स्मरणशक्तीच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवू शकतो. असं डेली मेलमध्ये एक्स्ट्रिम टेक वेबसाइटच्या मते मांडण्यात आलं आहे.
 
एका विशिष्ट काँप्युटर गेमद्वारे केवळ ४५ मिनिटांच्या प्रशिक्षण सत्रातून युजर ३० अक्षरांचा पासवर्ड आपल्या मेंदूतील एका कोपऱ्यात साठवून ठेवू शकतो. यासाठी एस, डी, एफ, जे, के, एल या सहा बटनांचाच उपयोग केला जातो.

First Published: Tuesday, July 24, 2012, 16:52


comments powered by Disqus